Chinese Naval Fleet Visit Bangladesh : चिनी नौदलाचा ताफा बांगलादेशाच्या बंदरावर पोचला !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये सत्तापालट झाल्यानंतर तो भारतविरोधी झाला आहे. बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. आता चिनी नौदलाच्या ताफ्याने १२ ऑक्टोबरला बांगलादेशाच्या चितगाव बंदराला भेट दिली. बांगलादेशात अंतरिम सरकार सत्तेवर आल्यानंतर हा देशात आलेला पहिला विदेशी ताफा आहे.
चीनच्या दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशाच्या देशांतर्गत परिस्थितीतील पालटांची पर्वा न करता चीन-बांगलादेश संबंध विकसित करण्याची चीनची वचनबद्धता तशीच आहे. चीन आमची पारंपारिक मैत्री भक्कम करण्यासाठी, मैत्रीपूर्ण देवाण-घेवाण आणि विविध क्षेत्रांत परस्पर लाभदायी सहकार्य वाढवण्यासाठी अन् उच्च दर्जाच्या वाहतूक प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी बांगलादेशासमवेत एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.
संपादकीय भूमिकाचीन भारताला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहे, त्यातीलच ही एक घटना आहे. भारताने बांगलादेशातील सत्तापालटाच्या प्रकरणात हस्तक्षेप केला असता, तर आज ही स्थिती आली नसती ! |