Gunfire At Jewish School : कॅनडातील ज्‍यूंच्‍या शाळेत गोळीबार : जीवित हानी नाही

अशा घटना सहन करणार नाही ! – पंतप्रधान ट्रूडो

गोळीबार करण्यात आलेली ज्‍यू धर्मियांची शाळा

टोरंटो (कॅनडा) – येथील नॉर्थ यॉर्क भागात ज्‍यू धर्मियांच्‍या शाळेत गोळीबार करण्‍यात आला. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ज्‍यूंच्‍या शाळेत गोळीबार होण्‍याची ही दुसरी घटना आहे. गोळीबाराच्‍या दोन्‍ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्‍याचा पोलिसांचा अंदाज आहे. गाझामध्‍ये युद्ध चालू  झाल्‍यापासून कॅनडामध्‍ये ज्‍यूविरोधी आक्रमणांमध्‍ये वाढ झाली आहे.

गोळीबाराच्‍या घटनेविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रूडो यांनी सांगितले की, या घटनेमुळे मी फार व्‍यथित आहे. ही घटना अशा वेळी घडली, जेव्‍हा ज्‍यू लोक त्‍यांच्‍या  धर्मातील सर्वांत पवित्र दिवस ‘योम किपूर’ साजरा करत होते. आज घाबरलेले आणि दुखावलेले विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक यांच्‍याप्रती मी दुःख व्‍यक्‍त करतो. ज्‍यूंच्‍या द्वेषाचा हा धोकादायक प्रकार आहे. अशा घटना आम्‍ही सहन करणार नाही. (खलिस्‍तानी भारताच्‍या दूतावासांवर आक्रमणे करतात, तसेच भारतविरोधी कार्यक्रमांचे षड्‍यंत्र रचतात, तेे ट्रूडो का सहन करत आहेत ?, हे त्‍यांनी जगाला सांगायला हवे ! – संपादक)