मद्यपी चालकाच्या चुकीमुळे कंटेनरची १० दुचाकींना धडक !
सांगली, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘गुगल मॅप’ने भलताच रस्ता दाखवल्याने अरूंद गल्लीत शिरलेल्या कंटेनरने अनेक दुचाकींना धडक दिली. यामध्ये १० दुचाकींचे अनुमाने ९५ सहस्र ५०० रुपयांची हानी झाली आहे. ही घटना ९ ऑक्टोबरच्या रात्री शहरातील कर्नाळ चौकी ते मगरमच्छ कॉलनी जाणार्या रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कंटनेर चालक अर्जुन देवकर (रा. खटाव, जिल्हा सातारा) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कर्नाटकातून आलेला हा कंटनेर सातारा येथे निघाला होता. अर्जुन याला बायपास रस्ता ठाऊक नसल्याने त्याने ‘गुगल मॅप’ लावले होते; मात्र त्याद्वारे तिसराच रस्ता दाखवल्याने त्याने वरील गल्लीत कंटनेर नेला. कंटनेर चालक अर्जुन हा नशेत होता, अशी माहिती नागरिकांनी दिली.