दिनदर्शिकेद्वारे परिचितांना आपल्या व्यवसायाची माहिती देतांना धर्मकार्यही घडावे, यासाठी स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घ्या !
उद्योजकांना नम्र विनंती !
अनेक उद्योजक स्वतःच्या आस्थापनाची (कंपनीची) प्रसिद्धी करण्यासाठी त्यांची विज्ञापने असणारी दिनदर्शिका (कॅलेंडर) प्रकाशित करून ती ग्राहक, कर्मचारी, नातेवाईक आदींना भेट स्वरूपात देतात. व्यावसायिक व्यस्ततेमुळे अनेक उद्योजकांना प्रत्यक्ष धर्मकार्यात सहभागी होता येत नाही. वरील दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी उद्योजक ‘सनातन पंचांगा’मधील विज्ञापनांच्या ठिकाणी केवळ स्वतःची विज्ञापने देऊन दिनदर्शिका वितरित करू शकतात. यामुळे वाचकांना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीच्या लिखाणाचा लाभ होऊन उद्योजकांचा धर्मकार्यातही सहभाग होईल, तसेच त्यांच्या उद्योगाची प्रसिद्धीही होईल.
सनातनचे हे निःस्वार्थी कार्य पाहून आतापर्यंत पुणे येथील ‘बाफना ज्वेलर्स’, गुजरातमधील ‘इलेक्ट्रोथर्म’, देहली येथील ‘मेट्रो बिल्डटेक’ आणि चेन्नई येथील ‘कुमारन् सिल्क’ आदी आस्थापनांनी केवळ स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घेतले आहे.‘सनातन पंचांगा’ची वैशिष्ट्ये !
१. आकर्षक रंगसंगती, सात्त्विक अंक आणि अक्षरे असलेले लिखाण !
२. देवतांची सात्त्विक चित्रे, राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन, तसेच आपत्काळाला तोंड देण्यासाठी आवश्यक पूर्वसिद्धता आणि मनोबल वाढवणारे उपाय अंतर्भूत !
३. मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती या भाषांत उपलब्ध !
उद्योजकहो, हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्मरक्षणासाठी उद्युक्त करणार्या ‘सनातन पंचांगा’त आपल्या आस्थापनाची विज्ञापने छापून घेऊन त्यांच्या वितरणाद्वारे धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा ! हे पंचांग छापून घेण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांनी पंचांग मुद्रणाच्या किमान ३ ते ४ आठवड्यांपूर्वी आपली माहिती sanatan.sanstha2025@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. या संदर्भात काही शंका असल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर संपर्क साधावा, ही विनंती !
आवाहन : पंचांगात प्रकाशित करावयाच्या विज्ञापनांच्या कलाकृती (‘आर्टवर्क’) उद्योजकांकडून सिद्ध करून मिळाल्यास साहाय्य होईल.