सुहासिनी जोशी यांना ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ पुरस्कार घोाषित !
सांगली, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी उपाख्य सुहास जोशी यांना रंगभूमीवरील मानाचे ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ पुरस्कार ७ ऑक्टोबर या दिवशी घोषित झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. मराठी रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबर या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. समितीद्वारे दिला जाणारा यंदाचा हा ५६ वा पुरस्कार आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम २५ सहस्र रुपये, स्मृतीचिन्ह, गौरवपदक, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.