गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !
मुंबई – महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यशासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. ते पदावर कार्यरत राहिपर्यंत त्यांना हा दर्जा असेल. गायींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी राज्यशासनाने वर्ष २०२३ मध्ये ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना केली आहे.