स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी १५ कोटी निधी संमत !

स्वातंत्र्यवीर सावरकर

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नाशिकमधील भगूर येथील जन्मस्थानी त्यांच्या जीवनावर आधारित ‘थीम पार्क’ उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून १५ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान येथे साकारण्यात येणार आहे.