थोडक्यात महत्त्वाचे

मद्यपीने दुचाकी पेटवली !

वसई – मद्यपी वाहनचालक शिवकुमार नायर (वय ३० वर्षे) याला पोलिसांनी पकडले. त्याने रागाच्या भरात स्वतःची दुचाकी जाळून टाकली.


२ अग्नीविरांचा मृत्यू !

नाशिक – येथील तोफखाना केंद्रात (आर्टिलरी सेंटरमध्ये) स्फोट झाल्याने २ अग्नीविरांचा मृत्यू झाला. सरावाच्या वेळी गोळीबार करतांना स्फोट झाला. गोहिल सिंग आणि सैफतत शीत असे अग्नीविरांची नावे आहेत.


‘महादेव बेटिंग ॲप’चा सूत्रधार अटकेत !

मुंबई – ‘महादेव बेटिंग ॲप’चा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने परराष्ट्र मंत्रालय आणि गृहविभाग यांच्या साहाय्याने चंद्राकरला कह्यात घेतले. ६ सहस्र कोटींच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. या ॲपची उलाढाल ५ सहस्र कोटींच्या घरात असल्याचा संशय आहे. ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणार्‍या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे.


हत्या करून मृतदेह जाळला !

ठाणे – उसने घेतलेले ५०० रुपये न दिल्याने लोखंडी पाईपने मारून एकाची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे, तर आणखी एक आरोपी फरार आहे. बारकू मारुती पडवळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.