तमिळनाडूत झाड तोडतांना सापडले १ सहस्र वर्ष जुने शिवलिंग
चेन्नई (तमिळनाडू) – कडलूरु जिल्ह्यातील चोळाधरम गावात १ सहस्र वर्ष जुने असणारे शिवलिंग सापडले आहे. झाडे तोडत असतांना दोन मोठ्या झाडांच्या मधोमध मातीत गाडलेले शिवलिंग आढळले आहे. याची माहिती मिळताच ‘अरण पाणी ट्रस्ट’च्या (पुण्य सेवा प्रतिष्ठानच्या) सदस्यांनी शिवलिंग अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. शिवलिंगाची पुनर्स्थापना करून त्याच्या संरक्षणासाठी पावले उचलल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे शिवलिंग पहाण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी लोक येत आहेत.
२ वर्षांपूर्वी कोडकनारू आणि अमरावती नदीच्या संगमाजवळ एका शेतभूमीत सहस्रो वर्षांपूर्वीचे शिवलिंग सापडले होते. ४ वर्षांपूर्वी रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिराच्या पूर्वेच्या काठावर एक शिवलिंग सापडले होते.