देहू आणि आळंदी पालखी मार्गांवर विठ्ठलमहिमा दर्शवणारे चित्ररथ साकारले जाणार !
मुंबई – आषाढी वारीनिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव देहू आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मगाव आळंदी येथून या थोर संतांच्या नावांच्या दिंड्यांचे आयोजन करण्यात येते. या दोन्ही पालखीमार्गांवरून या कालावधीत लाखो भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या मार्गावर श्री विठ्ठलाचा महिमा दर्शवणारे चित्ररथ साकारण्याचा निर्णय राज्यशासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. यासाठी २ लाख ५० सहस्र रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. यामध्ये संस्कृती दर्शवणार्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.