दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !
महाविद्यालयीन युवतीची एस्.टी.त छेड काढल्याचे प्रकरण
दापोली (जि. रत्नागिरी) – महाविद्यालयीन युवतीची छेड काढणार्या मजित तांबोळी या वाहकाला राज्य परिवहन महामंडळाने निलंबित केले आहे. १० ऑक्टोबरला त्याला महामंडळाच्या सेवेतून निलंबित केल्याची माहिती दापोली आगार प्रभारी व्यवस्थापक मुनाफ राजापकर यांनी दिली.
९ ऑक्टोबर या दिवशी एस्.टी.तून वणौशी येथून पंचनदी येथील कनिष्ठ महाविद्यालयाकडे प्रवास करत असतांना मजिद तांबोळी याने महाविद्यालयीन युवतीची छेड काढली होती. छेड काढण्याची घटना २-३ वेळा घडली. छेड काढल्यानंतर वाहकाला विद्यार्थिनींनी चपलेने चोप दिला होता. ग्रामस्थांच्या दबावानंतर त्याला पोलिसांनी कह्यात घेऊन भारतीय न्याय संहिता ७४ आणि ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत अटक केली होती. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे करत आहेत.
संपादकीय भुमिकाजनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचाच हा प्रकार होय. स्वत:चे ओळखपत्र आणि ‘बॅच’ नसणार्या अशा आरोपी वाहकाचे केवळ निलंबन करणे, म्हणजे त्याला अर्धा पगार देऊन त्याच्या चौकशीनंतर पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी तात्पुरती केलेली कारवाईच होय ! अशांना बडतर्फच केले पाहिजे. |