‘परस्त्री मातेसमान’ हे कृतीतून दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे हिंदु धर्माचरणी राजे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
सांगली, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – परकियांच्या जोखडातून खंडप्राय असा हिंदुदेश मुक्त करत असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण कार्यासाठी सूरतेची लूट केली. या वेळी ‘लूट’ म्हणून सादर करण्यात आलेली परधर्मीय ‘स्त्री’ समोर आल्यावर तिचा मातेसमान सन्मान करून तिची पाठवणी करून दिली. ‘परस्त्री मातेसमान’ हे कृतीतून दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे हिंदु धर्माचरणी राजे होते. शत्रूवर विजय मिळवूनही क्षणोक्षणी हिंदु धर्मानुसार आचरण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वगुणसंपन्नतेमुळे आजही आपले आदर्श आहेत, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी ११ ऑक्टोबर या दिवशी येथे केले. शहरातील विविध मार्गांवरून दौड निघून शिवतीर्थ येथे दौडीची सांगता झाल्यानंतर धारकर्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
शहरातील शिवतीर्थ, श्री दुर्गामाता मंदिर, पटेल चौक, बुरूड गल्ली, सराफ कट्टा, गावभाग, कुंभार खिंड, विवेकानंद चौक, केशवनाथ, मारुति रस्ता या मार्गाने श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दौडीत मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे अधिकारी श्री. मंगेश चिवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.