पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अडीच सहस्र घरे बांधणार !
मुंबई – पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात म्हाडा २ सहस्र ५०० घरे म्हाडा बांधणार आहे. या घरांच्या उभारणीसाठी नुकत्याच निविदा अंतिम करून राज्य सरकाराला पाठवण्यात आल्या. या निविदांना राज्य सरकारने संमती दिली आहे. वर्ष २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यातील वरळीतील पुनर्विकास प्रकल्पातील घरांचे वाटप मार्च २०२५ पर्यंत देण्याचा प्रयत्न असेल. नायगाव आणि एन्.एम्. जोशी मार्गवरील संक्रमण शिबिरार्थींना ऑक्टोबर, डिसेंबर २०२५ पर्यंत घरांचे वाटप होईल.’’