मुंबईत नदी-नाल्यांतील कचरा काढण्यासाठी ‘ट्रॅम बूम’ यंत्रणा वाढवणार !
मुंबई – महानगरपालिकेच्या पर्जन्य खात्याने नदी नाल्यांतील प्लास्टिकसह कचरा समुद्रात वाहून जाऊ नये यासाठी तो गोळा करण्यासाठी ‘ट्रॅम बूम’ हे यंत्र आता मोठ्या प्रमाणात बसवायचे ठरवले आहे. या यंत्राचे सरकते पट्टे प्रवाहातील तरंगता कचरा अडवून तो बाहेर काढतात आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होतो. आतापर्यंत ८ ठिकाणी ही यंत्रणा यापूर्वीच बसवण्यात आली आहे. आता पूर्व उपनगरांतील आणखी १६ नाल्यांतील कचरा काढण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
यापूर्वी मिठी नदीत २ ठिकाणी अशा यंत्रणा बसवल्या आहेत, आता त्या वाढवण्यात येणार आहेत. मुंबईत गजधरबंध नाला, पेव अव्हेन्यू नाला, मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोईसर नदी, दहिसर नदी, पाकोला नदी येथेही यापूर्वी ही यंत्रणा बसवली आहे.