पाकिस्‍तान सीमेवर २ सहस्र २८० किमी रस्‍ते बांधणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

जोधपूर (राजस्‍थान) – केंद्र सरकार राजस्‍थान आणि पंजाब यांच्‍या पाकिस्‍तान सीमेवर तारेच्‍या कुंपणाजवळ रस्‍त्‍यांचे जाळे पसरवणार आहे. या राज्‍यांच्‍या सीमावर्ती भागांत २ सहस्र २८० किमीचे रस्‍ते बांधण्‍यासाठी ४ सहस्र ४०६ कोटी रुपयांचा निधी संमत करण्‍यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने या प्रस्‍तावाला संमती दिली.

पाकिस्‍तानमधील चीनच्‍या ‘सीपीईसी’ या आर्थिक प्रकल्‍पाला उत्तर म्‍हणून म्‍हणून भारताने पश्‍चिम आघाडीवर रस्‍त्‍यांचे जाळे विणले आहे. ‘भारतमाला’ प्रकल्‍पांतर्गत सीमेपासून ४० ते ५० किमीवरील १ सहस्र ४९१ किमी लांबीच्‍या रस्‍त्‍यांचे आणि १ सहस्र २५४ किमी लांबीच्‍या अमृतसर-जामनगर ‘इकॉनॉमी एक्‍स्‍प्रेस व्‍हे’चे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.