India Rejects Trudeau’s Claim : लाओसमध्ये पंतप्रधान मोदी यांना भेटल्याचा कॅनडाच्या पंतप्रधानांचा दावा भारताने फेटाळला !
वियेन्टीयन (लाओस) – थायलंडच्या शेजारी असणार्या लओस देशामध्ये नुकतीच पूर्व आशिया शिखर परिषदेचे (‘आसियान’चे) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले. ‘या बैठकीत महत्त्वाच्या सूत्रांवर काम करण्यासाठी चर्चा झाली’, असे ते म्हणाले; मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांना सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये अशी कोणतीही भेट झाली नाही.
India rejects Canadian PM Justin Trudeau’s claim : “Discussion at Laos wasn’t ‘substantive’”
👉 Trudeau’s falsehood once again comes to light. India should reconsider maintaining relations with a country, that is led by such a Prime Minister#Diplomacypic.twitter.com/qBFawQEgha
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2024
१. गेल्या वर्षी पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी निज्जर याची हत्या केल्याचा आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
२. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलनी जोली यांनी एक दिवसापूर्वीच ‘कॅनडाचे भारतासमवेतचे संबंध ‘तणावपूर्ण’ आणि ‘खूप ताणलेले आहेत’, असे म्हटले होते. मेलनी यांनी सांगितले की, सरकार निज्जरच्या मृत्यूच्या चौकशीसाठी भारताचे साहाय्य घेत आहे; मात्र भारताकडून अद्याप साहाय्य मिळालेले नाही. आम्हाला कॅनेडातील लोकांच्या सुरक्षेची काळजी आहे.
संपादकीय भूमिकाट्रुडो यांचा खोटारडेपणाही आता समोर आल्याचेच यातून लक्षात येते ! अशा देशाच्या पंतप्रधानांसमवेत भारताने संबंध तरी का ठेवावेत ? |