Muslims Threatened Kolkata Durga Puja : बांगलादेशात नव्हे, तर कोलकाता येथे मुसलमान मुलांची दुर्गापूजा मंडपात घुसून धमकी !
अजान चालू असल्याने ध्वनीक्षेपक बंद करण्याची धमकी
कोलकाता (बंगाल) – येथील गार्डनरीच भागातील एका दुर्गापूजा मंडपामध्ये मुसलमान मुलांनी घुसून ‘अजान चालू असल्याने येथील भोंग्यांवरील गाणी बंद करा’, अशी धमकी दिली. या वेळी दुर्गापूजेचे आयोजक आणि मुसलमान मुले यांच्यात वाद झाला. या प्रकरणी पोलिसांत माहिती देण्यात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोचून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी दुर्गापूजेच्या आयोजकांच्या तक्रारीवरून २ अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
हे कोलकाता आहे, ढाका नाही, याची पोलिसांनी जाणीव करून द्यावी ! – भाजप
या घटनेचा व्हिडिओ राज्यातील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार शुभेंदू अधिकारी यांनी सामाजिक माध्यमात शेअर केला आहे. त्यांनी कोलकाता पोलीस आयुक्तांना याविषयी सूचित (टॅग) केले आहे. ‘दुर्गापूजा मंडपालमध्ये गुंड कसे पोचले ? हे गुंड दुर्गामातेची मूर्ती तोडण्याची धमकी देत होते. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आयोजकांनी प्रसारित केला आहे. कोलकाता पोलीस आयुक्त आरोपींवर कठोर कारवाई करतील, अशी आशा आहे. तसेच आयुक्त गुंडांना ‘हे कोलकाता आहे, ढाका नाही’ याची जाणीव करून देतील, असे शुभेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
What is this Mr. @CPKolkata; Shri Manoj Kumar Verma (IPS)?
How did the goons garner the ability to storm into a Durga Puja Pandal under the Jurisdiction of the @KolkataPolice and threaten to vandalise the idol of Maa Durga if the rituals aren’t stopped?
The incident happened at… pic.twitter.com/QQmcSf10Jo— Suvendu Adhikari (@SuvenduWB) October 11, 2024
आयोजक अशोक साधुखान यांनी सांगितले की, मंडपामध्ये ५० ते ६० मुसलमान मुले आली आणि त्यांनी महिलांच्या अंगावर हात उगारला, त्यांना ढकलले आणि खाली पाडले.
संपादकीय भूमिकादेशात सर्वत्रच्या मशिदींतून ५ वेळा अजान ऐकवली जाते; मात्र हिंदूंनी कधी ‘आमची आरती चालू असल्याने तुमच्या अजानचा आवाज बंद करा,’ असे कधी सांगितल्याचे ऐकिवात नाही; मात्र धर्मांध मुसलमानांना हिंदूंनी सणांच्या काळात लावलेली गाणी अजानच्या वेळी चालत नाही. यावरून सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनी दाखवायचा आणि अन्यांनी धर्मांधता जोपासायची, अशीच देशातील स्थिती आहे. ती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |