महाराष्ट्राचे चित्रपट धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना !

मुंबई – महाराष्ट्राचे चित्रपट धोरण निश्चित करण्यासाठी राज्यशासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने समिती गठीत केली आहे. ज्येष्ठ निर्मात्या श्रीमती स्मिता ठाकरे समितीच्या अध्यक्ष आहेत. निर्माता, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई, कलाकार आसावरी जोशी, प्रिया बेर्डे, सविता मालपेकर आदी २२ जणांचा समितीमध्ये समावेश आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, चित्रपट समीक्षक यांचा समितीमध्ये समावेश आहे. मराठी चित्रपटांची निर्मिती सुलभ करणे, चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणे, वेब सिरीज, ओटीटी प्लॅटफॉर्म, ॲनिमेशन आदींमध्ये मराठी चित्रपटांची प्रगती साधणे, ग्रामीण आणि नागरी भागांमध्ये चित्रपट निर्मिती करता यावी आदी कारणांसाठी समिती काम करील. मराठी चित्रपटांचे नाव जागतिक पातळीवर पोचावे आणि चित्रपटसृष्टीला अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी ही समिती काम करणार आहे.

संपादकीय भूमिका

चित्रपटांतून श्रद्धास्थानांचा होणारा वाढता अवमान रोखण्यासाठीही समितीने लक्ष घालावे !