उधार मागणार्या विक्रेत्याच्या तोंडावर उकळता चहा फेकला !
संयम नष्ट होत असल्याचे दर्शवणारी घटना !
मुंबई – काळाचौकी परिसरात चहाच्या उधारीचे पैसे मागितल्यावर गिर्हाईकाने चहाचे पातले उचलून उकळता चहा विक्रेत्याच्या तोंडावर फेकला. (स्वतः उधारी ठेवायची आणि ती मागितल्यावर अरेरावी करायची ! असे करणार्याला कठोर शिक्षाच व्हायला हवी ! – संपादक) उकळता चहा अंगावर पडल्याने विक्रेता भाजला असून पातेलेही त्याच्या तोंडावर आपटल्याने त्याला दुखापत झाली आहे.