६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मंगळुरू (कर्नाटक) – अनुमाने ६ कोटी रुपये किमतीचे ६ किलोग्रॅमपेक्षा अधिक ‘एम्.डी.एम्.ए.’ हे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त करून या प्रकरणी नायजेरियाच्या एका नागरिकाला अटक केली. इतक्या मोठ्या मूल्याचे अमली पदार्थ मंगळुरू शहरातून जप्त करण्याचीही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.