नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला चंडीयाग !
रामनाथी (फोंडा) – नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी सप्तर्षींच्या आज्ञेने येथील सनातनच्या आश्रमात ९ ते ११ ऑक्टोबर या दिवशी चंडीयाग करण्यात आला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत हा याग करण्यात आला.
सप्तमी ते नवमी या दिवसांमध्ये ‘चंडी होम’, तसेच विजयादशमीच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘महामृत्यूंजय होम’ करण्यात येणार आहे. प्रतिदिन यागानंतर देवीची आरती करण्यात आली. यागाचे पौरोहित्य सनातन वेदपाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. ईशान जोशी यांनी केले.