नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व !
नवरात्रीत स्वभावदोष आणि अहं नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याने स्वत:तील महिषासुररूपी आसुरी वृत्तीचे दमन होते. सूक्ष्म स्तरावरील तमोगुण नष्ट होऊन सात्त्विकता वाढते. ‘दसरा’ म्हणजे ९ दिवस स्वत:तील तमोगुणाचा लय करून सत्त्वगुणामुळे मिळणारा आनंद अनुभवण्याचा दिवस !
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |