Neelmatha Temple : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील श्री दुर्गादेवीची मूर्ती यंत्राद्वारे तोडली !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील नीलमाथा मंदिरात बसवण्यात आलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती चोरट्यांनी यंत्राद्वारे तोडली. याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोचले. परिस्थिती लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेच्या एक दिवस आधी शहरातील बाजारखालामधील एका मंदिराबाहेर मांसाचे तुकडे फेकल्याच्या प्रकरणी अलीमा नावाच्या मुसलमान महिलेला अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाअशा घटना हिंदूंसाठी लज्जास्पद ! उत्तरप्रदेशात अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |