‘Jai Bhole’ : जळगाव येथे ‘जय भोले’ म्हणणार्या हिंदूला ४० धर्मांधांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न !
जळगाव – येथे एका हिंदु युवकास ४० धर्मांधांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने केवळ ‘जय भोले’ असे म्हटले होते. यावर धर्मांधांनी ‘आमच्या धार्मिक भावना दुखावल्या’, असे सांगून त्याला मारहाण केली. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
१. जळगाव येथील तांबापुरा भागात जय सोनावणे त्याच्या मित्रासह थांबला होता. इतक्यात त्याला त्याच्या दुसर्या मित्राचा भ्रमणभाष आला. त्याने तो उचलल्यावर ‘जय भोले’ असे म्हटले.
२. तेव्हा जवळच असलेल्या काही धर्मांधांनी त्याला ‘तू ‘जय भोले’ का म्हणलास ?’ असे विचारून मारहाण केली.
३. आधी तेथे केवळ ४ धर्मांधच होते; पण नंतर त्यांची संख्या वाढून ४० इतकी झाली. (धर्मांधांचे इतक्या मोठ्या प्रमाणात संघटन कसे होते ? याचा अर्थ हे पूर्वनियोजित आक्रमण नसेल कशावरून ? – संपादक)
४. या आक्रमणात जय याच्या डोळ्याजवळ खोल जखम झाली आहे.
संपादकीय भूमिका
|