Anil Yadav Arrested : महंत यति नरसिंहानंद यांचे शिष्य अनिल यादव यांना अटक !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील श्री डासनादेवी मंदिराचे महंत आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद यांचे शिष्य अनिल यादव उर्फ छोटा नरसिंहानंद यांना गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. अनिल यादव यांनी त्यांचे गुरु यति नरसिंहानंद यांचा पुतळा जाळणार्या मुसलमानांचे श्रद्धास्थान असलेले महंमद अली आणि अबू बकर यांचा पुतळा जाळण्याची चेतावणी दिली होती.
अनिल यादव यांच्या चेतावणीनंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते. १० ऑक्टोबरच्या रात्री उशिरा पोलिसांनी अनिल यादव यांना शांतता भंगाच्या कलमांखाली अटक केली. महंत यति नरसिंहानंद यांना पोलिसांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले होते; मात्र त्यानंतर यति नरसिंहानंद यांच्या ठावठिकाणाविषयी पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.