Vote Jihad : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीतही ‘व्होट जिहाद’ !
हिंदूंची मते विभागली गेली !
चंडीगड (हरियाणा) – मुसलमान कुठेही असले, तरी त्यांच्यासाठी त्यांच्या देशापेक्षा धर्म महत्त्वाचा असतो. त्यांच्या या मनोवृत्तीमुळे भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांचे फावते. अशात आघाडीवर असणार्या काँग्रेसकडून हिंदुद्वेष आणि मुसलमान अनुनय हा एककलमी कार्यक्रम चालवला जातो आणि यातूनच ‘व्होट जिहाद’चा जन्म होत असतो. असाच काहीसा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा देशाने घेतला. भाजपने सरकारी योजनांचा लाभ देतांना धर्मनिरपेक्षतेचा वास्तविक अंगिकार करूनही त्याला त्याचा राजकीय लाभ कधीच होत नाही, तर तोटाच होतो, हेही उघड आहे. अशातच राजकीय वर्तुळात असा दावा केला जात आहे की, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मुसलमान मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना हरवण्यासाठी भाजपविरोधी पक्षांना एकगठ्ठा मतदान केले.
हरियाणातील स्थिती !
१. हरियाणा विधानसभा मतदारसंघात ९० पैकी ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुसलमान बहुसंख्यांक आहेत. या ४ जागांवर काँग्रेसला एकतर्फी विजय मिळाला.
२. दुसरीकडे हरियाणाच्या लोहारू विधानसभा मतदारसंघात ९९.४ टक्के हिंदु मतदार आहेत; मात्र हिंदूंच्या मतविभाजनामुळे काँग्रेस पक्षाचा उमेदवार ७९२ मतांनी येथे विजयी झाला.
३. हरियाणातील या दोन बोलक्या उदाहरणांतून हिंदूंची कूपमंडूक वृत्ती, जातीचे राजकारण आदी हिंदूंना घातक ठरणार्या गोष्टी लक्षात येतात.
हिंदुबहुल जम्मूतही कट्टर मुसलमान पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’चा ७ जागांवर विजय !
१. जम्मू काश्मीरचा विचार केला असता, जम्मू विभागात ६२.६ टक्के हिंदु आणि ३३.५ टक्के मुसलमान आहेत; मात्र भाजपला हिंदूबहुल जम्मूमध्ये ४३ पैकी केवळ २९ जागांवर विजय मिळाला.
२. याच हिंदूबहुल जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला ७ जागांवर, तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे.
३. याउलट काश्मीरमध्ये ९६.४ टक्के मुसलमान लोकसंख्या असून हिंदूंची लोकसंख्या केवळ २.५ टक्के आहे. तिथे एकाही जागेवर भाजपला विजय मिळवता आला नाही. नॅशनल कॉन्फरन्सला काश्मीरमध्ये ३९ पैकी ३५ जागांवर विजय मिळाला, तर काँग्रेसने ९ पैकी ५ जागांवर विजय मिळाला.
या आकडेवारीवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की, मुसलमान समाजात कुणाला मतदान करायचे, हे आधीच ठरलेले असते, तर हिंदू जातीजातींमध्ये विभागले गेले असल्याने आजही संभ्रमावस्थेत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमान धर्माला प्राधान्य देतात, तर हिंदू त्यांच्या जातीला ! हीच मानसिकता हिंदूंसाठी आत्मघात ठरत आहे ! यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदूंना फटका बसला, तर आश्चर्य वाटू नये ! महाराष्ट्रातील हिंदूंनो, आतातरी जागरूक व्हा अन्यथा ४०० वर्षांपूर्वी नाही, पण निकटच्या भविष्यात तुम्हा सर्वांची सुंता होईल, हे विसरू नका ! |