Giorgia Meloni Expelled Imam : हमासचे समर्थन करणार्‍या पाकिस्‍तानी इमामाला इटली सरकारने देशाबाहेर हाकलण्‍याचा दिला आदेश !  

(इमाम म्‍हणजे मशिदीमध्‍ये प्रार्थना करून घेणारा)

पाकिस्‍तानचा इमाम झुल्‍फिकार खान व इटलीच्‍या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी

रोम (इटली) – इटलीत रहाणार्‍या पाकिस्‍तानच्‍या झुल्‍फिकार खान नावाच्‍या ५४ वर्षीय इमामाला इटलीच्‍या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देशातून हाकलून देण्‍याचा आदेश दिला आहे. आतंकवादी संघटना हमासचा कट्टर समर्थक असल्‍याने त्‍याला हाकलून देण्‍याचा आदेश दिला. तसेच त्‍याचा इटलीतील निवास परवानाही रहित करण्‍यात आला.

झुल्‍फिकार याचा जन्‍म पाकिस्‍तानात झाला होता; मात्र तो वर्ष १९९५ पासून इटलीतील बोलोग्‍ना शहरात रहात होता. त्‍याने गाझा युद्धाच्‍या संदर्भात अनेक आक्षेपार्ह व्‍हिडिओही पोस्‍ट केले आहेत. त्‍याने इस्रायल आणि अमेरिका यांना ‘खुनी’ म्‍हटले होते.

त्‍याची भाषणे पाश्‍चात्त्यविरोधी, समलैंगिकताविरोधी आणि महिलाविरोधी होती. तसेच तो इटलीतील मुसलमानांना इटली सरकारच्‍या धोरणांचा विरोध करण्‍यासाठी भडकावत होता.

संपादकीय भूमिका

भारत अशा प्रकारचे निर्णय कधी घेणार ? भारतात जिहादी आतंकवादी संघटनांचे समर्थन करणारे उघडपणे बोलत असतात. त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !