‘महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन !
तुळजापूर – महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या ‘राज्यमाता गो-माते’चा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनास सादर केला होता. त्या प्रस्तावावर आयोगाच्या माध्यमातून शेखर मुंदडा यांनी पाठपुरावा केला आहे. ‘राज्यमाता गो-माता’ घोषित झाल्यामुळे शेखर मुंदडा यांनी श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले. या वेळी मंदिर समितीतील तहसीलदार माया माने यांच्या समवेत शेखर मुंदडा यांची गोशाळा चालू करण्याविषयी चर्चा झाली. या वेळी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, ‘महा एन्जीओ फेडरेशन’चे संचालक अमोल उंबरजे, समन्वयक तानाजी जाधव, दिनेश दणके, परिक्षित साळुंखे उपस्थित होते.