आज नवी मुंबई विमानतळावरून ‘सुखोई’ विमानाचे उड्डाण !
नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायूदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणीची सिद्धता चालू आहे. ११ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चाचणी केली जाणार आहे. धावपट्टीवरील चाचणीमध्ये हवाई दलाचे सुखोई विमान धावपट्टीपासून काही अंतरावर उडणार आहे. अन्य विमान प्रत्यक्ष विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले जाणार आहे.
मार्च २०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालू होणे अपेक्षित आहे. जून २०२५ पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालू करण्याचे शासनाचे नियोजन आहे.