गाय हा दैवी जीव असल्याने व्यक्तीमधील गायीप्रतीच्या भावानुसार व्यक्तीला गायीकडून प्रतिसाद मिळत असणे
श्री. रामचंद्र (दादा) कुंभार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६२ वर्षे) : परम पूज्य, आमच्या घरी गोठ्यात एक गाय आहे. ती माणसांना चाटते. मी प्रवास करून घरी गेल्यानंतर, त्रास किंवा अन्य काही कारणे यांमुळे माझे डोके दुखत असल्यास गायीने मला चाटल्यानंतर माझे डोके दुखण्याचे थांबते आणि मी तरतरीत (फ्रेश) होतो. तेव्हा मी अजून काही प्रयोग करायचे ठरवले. मी घरातील व्यक्तींनाही सांगितले, ‘‘तुमच्या काही अडचणी असल्या, तर मला भ्रमणभाष करू नका. गायीच्या कानात सांगा.’’ घरातील व्यक्तींनी यानुसार केल्यावर त्यांनाही लाभ झाला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : गाय हा दैवी जीव आहे. एखाद्यामधील गायीप्रतीच्या भावानुसार त्याला तिच्याकडून प्रतिसाद मिळतो. त्याच्या अडचणी दूर होतात. तुम्ही कुत्र्याला सांगितले, तर असे होणार नाही.