श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा !
श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा !
तुळजापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानीमातेने प्रसन्न होऊन तिच्या हाताने भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला. त्यामुळे या दिवशी देवीला महाअलंकार घालण्यात येऊन ती छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते. ११ ऑक्टोबर या दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे, तसेच सकाळी ७ वाजता होम आणि हवनास आरंभ, दुपारी १२.१५ वाजता पूर्णाहुती देण्यात येणार आहे.