हिंदूंनी आपापसांतील भेद विसरून हिंदु धर्मासाठी कार्य करावे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर – सध्या चालू असलेल्या नवरात्रात धर्मांधांकडून ठिकठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होणे, तसेच अन्य घटनाही वाढत आहेत. या घटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी जातपात, पक्ष विसरून संघटित होऊन हिंदु धर्मासाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते उंचगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीत धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी ३०० हून अधिक धारकरी उपस्थित होते.