Census : पुढील वर्षी जनगणना होण्याची शक्यता
नवी देहली – देशात वर्ष २०२५ मध्ये जनगणना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जनगणना निबंधकांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत राज्यांना त्यांची मंडळे, जिल्हे, उपविभाग, तहसील आणि गाव यांच्या सीमा पालटण्याची अनुमती देणारा आदेश काढला आहे. यापूर्वी ही मर्यादा ३० जूनपर्यंत होती. जनगणना चालू करण्यासाठी सरकारी सीमा बंद करणे ही पहिली अट आहे. यामुळेच पुढील वर्षी जनगणना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.