दाखवा जगाला हिंदु राष्ट्राचा रामराज्य आदर्श ।
उद्या १२ ऑक्टोबर या दिवशी ‘दसरा’ आहे. त्या निमित्ताने…
कलियुगातील रावणाची ।
ही पहा तोंडे दहा ।।
धर्मांतर, भ्रष्टाचार तथा ।
लव्ह जिहाद, लँड जिहाद पहा ।। १ ।।
धर्मद्रोह, देशद्रोह, गोहत्या ।
तथा जातीवाद ।।
केवळ हिंदु अंधश्रद्धा निर्मूलन ।
आणि विविध आतंकवाद ।। २ ।।
अशी कलियुगातील रावणाची ।
ही आहेत तोंडे ।।
दशहरा साजरा करा
।नष्ट करूनी दशाननासुर हा ।। ३ ।।
रावण राज्य नष्ट करूनी ।
सीमोल्लंघन करा ।।
दाखवा जगाला हिंदु राष्ट्राचा ।
रामराज्य आदर्श खरा ।। ४ ।।
– श्री. द.र. पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.