व्यायामाचा १०० टक्के लाभ मिळवण्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे !
निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग १७
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/842215.html
‘कलियुगात मनुष्याच्या जीवनशैलीत अनेक पालट झाले आहेत. सध्या अनेक कारणांमुळे लोक जागरण करतात. दोन दिवसांचा उपवास सहन होऊ शकतो; पण दोन दिवस झोप पूर्ण झाली नाही, तर तिसर्या दिवशी त्याचे शरीर आणि मन यांवर परिणाम दिसून येतात.
‘स्वास्थ्य सुधारण्यासाठी पुरेशी झोप घेणे’, हेही व्यायाम करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. व्यायाम करतांना उद्युक्त् केलेल्या स्नायूंचे पोषण आणि पुनर्निर्माण झोपेतेच होते. झोपेत शरीर ऊर्जा साठवण्याचे कार्य करते, जेणेकरून दिवसभरात कार्यक्षमतेत वाढ होण्यास साहाय्य होते. पुरेशी झोप न झाल्याने मानसिक ताण आणि चिंताही वाढते.
आधुनिक संशोधनातून लक्षात आले आहे की, झोप पूर्ण न झाल्यास व्यायाम करण्याची क्षमता न्यून होऊन अशक्तपणा वाढतो, तसेच इतर शारीरिक क्रियांवरही विपरीत परिणाम होतो. झोप पूर्ण न झाल्याचे हे परिणाम व्यायामाच्या उद्देशाला मारकच आहेत.
खरेतर नियमित व्यायाम करणार्या व्यक्तीने न्यूनतम ६ – ७ घंटे झोप घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत घेतलेली झोप चांगल्या गुणवत्तेची असते. या वेळेत झोपल्याने झोपेच्या चक्रात योग्य समतोल साधला जाऊ शकतो. व्यायामाचा १०० टक्के लाभ मिळवण्यासाठी, दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.
आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आणि शरिराला योग्य पोषण मिळण्यासाठी झोपेचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार दिनचर्या अवलंबा !’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise