शक्ती दे आई ! आई गोंधळाला ये !
आज सर्वत्र अनाचार, अत्याचार, अधर्म आणि अनैकिता दिसून येत आहे. राष्ट्र आणि धर्म विरोधी शक्ती या सातत्याने हिंदूंचे लचके तोडत आहेत. आता वेळ आली आहे हिंदूंनो जागृत होण्याची ! नवरात्रीचा काळ हा उपासना आणि शक्ती यांचा काळ आहे. अधर्माच्या निर्मूलनाचा काळ आहे. यासाठी नवरात्रीच्या काळात सामूहिक प्रार्थनेच्या रूपातून देवीचा जागर करूया आणि हिंदूंमध्ये शक्तीच्या उपासनेला आरंभ करूया.
आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये !
१. आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी, शुंभ-निशुंभ दैत्यांचा नाश करणारी जगत्जननी दुर्गादेवी, महिषासुराचा संहार करणारी महिषासुरमर्दिनी, आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये !
२. आई भवानी दैत्य माजले आहेत, देव, देश आणि धर्म आज संकटात आहे, आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये !
३. आज आमच्या आया-बहिणींवर हात टाकला जात आहे, धर्मांधांच्या वासनांध नजरा क्षणोक्षणी आमच्या मुलींच्या अब्रूचे लचके तोडत आहेत, आमच्या मुलींना फसवून लव्ह जिहाद केला जात आहे, आमच्या मुली असुरक्षित आणि भीतीच्या छायेत जगत आहेत, आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये !
४. आमच्या गोमातेची दिवसाढवळ्या हत्या केली जात आहे, आमच्या भूमी ‘लँड जिहाद’च्या नावाने बळकावल्या जात आहेत, ‘हलाल जिहाद’च्या नावाने आमच्यावर ‘जिझिया कर’ लादून आमचा धर्म भ्रष्ट केला जात आहे, आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये !
५. आज बघावे तिकडे अनैतिकता, भ्रष्टाचार, जातीजातींमध्ये होणारे विभाजन, पक्षीय राजकारण यात हिंदु समाज भरडला जात आहे, आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये !
६. आजची हिंदूंची युवा पिढी शौर्य आणि मनगटाची शक्ती विसरून नशेच्या आहारी जात आहे, हातात भ्रमणभाष घेऊन ‘ऑनलाईन’ खेळांच्या आहारी गेली आहे; देव, देश आणि धर्म हे स्वतःच्या जीवनाचे ध्येय आजचा हिंदु समाज विसरला आहे, आई गोंधळाला ये, आई गोंधळाला ये !
देवीच्या चरणी प्रार्थना !
आई, आम्ही तुला शरण आलो आहोत, आम्ही तुला प्रार्थना करतो, ‘शक्ती दे आई, शक्ती दे ! प्रत्येक हिंदु माता-भगिनींमध्ये दुर्गेचे, कालीमातेचे, भवानीमातेचे रूप आहे, ही जाणीव त्यांच्यात निर्माण करण्यासाठी आई आम्हाला शक्ती दे ! छत्रपती शिवरायांप्रमाणे शक्ती आणि भक्ती यांचे सामर्थ्य आम्हा हिंदूंमध्ये निर्माण करण्यासाठी आम्हाला शक्ती दे आई, शक्ती दे ! आमच्या देवीदेवतांचे होणारे विडंबन, संतांचा होणारा अवमान, आमच्या मुली, आमची गोमाता, आमची मंदिरे यांचे प्राणपणाने रक्षण करण्यासाठी आम्हाला शक्ती दे आई, शक्ती दे ! ‘धर्म हाच राष्ट्राचा प्राण असतो’, ही भावना प्रत्येक हिंदूंच्या मनात निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार आमच्या हृदयात कोरण्यासाठी आम्हाला शक्ती दे आई, शक्ती दे ! आई एकच मागणी तुझ्याकडे, छत्रपती शिवरायांसारखा स्वराज्याचा मुकुट हिंदु राष्ट्राच्या रूपाने भारतमातेच्या मस्तकी चढवण्यासाठी आम्हाला शक्ती दे आई, शक्ती दे ! शक्ती दे आई, शक्ती दे !’
– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.