Israel Will Strike Iran : इस्रायल इराणवर पलटवार करण्याच्या सिद्धतेत !
तेल अविव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये इराणला प्रत्युत्तर देण्याच्या सूत्रावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेचा पूर्ण अधिकार असल्याचा पुनरुच्चार बायडेन यांनी केला. यापूर्वी बायडेन म्हणाले होते की, इस्रायलने इराणच्या तेल आणि आण्विक केंद्र यांवर आक्रमण टाळावे.
इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलांट यांनी म्हटले आहे की, ते इराणवर अचानक मोठे आक्रमण करणार आहेत.