कर्नाटक : ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांकडून दसर्याच्या सुटीचे उल्लंघन !
|
धारवाड (कर्नाटक) – ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांनी दसर्याच्या सुटीचे उल्लंघन केले आहे, असा आरोप श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी येथे केला. कर्नाटकात दसर्याची सुटी अधिकृतपणे घोषित झाली आहे; मात्र दसर्यानिमित्त घरी पूजा करण्याच्या वेळी या संस्थांनी शाळेत परीक्षा ठेवल्या आहेत. हिंदु संस्कृतीचा अपमान, अवमान, अवहेलना करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे, असे म्हणत मुतालिक यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुतालिक म्हणाले की, ख्रिस्ती शैक्षणिक संस्था राष्ट्रीयत्व आणि भारतीय परंपरा यांकडे दुर्लक्ष करत आले आहेत. त्यांच्या शाळांमध्ये हिंदु मुलींना बांगड्या, कुंकू, पैंजण धारण करता येत नाही. यातच आता त्यांनी सरकारी आदेशाचेही उल्लंघन केले आहे. अशा शाळांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी मुतालिक यांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|