M.P. Muslims In Garba : मध्यप्रदेशात गरबा पंडालमध्ये नाव पालटून प्रवेश करणार्या २ मुसलमानांना पकडले !
इंदूर – मध्यप्रदेशातील उज्जैन आणि इंदूर येथे ८ ऑक्टोबरच्या रात्री गरबा मंडपामध्ये नावे पालटून प्रवेश करणार्या २ मुसलमान तरुणांना पकडण्यात आले. फिरोज नावाच्या मुसलमानाने उज्जैनमधील गरबा मंडपामध्ये ‘राहुल’ असे नाव सांगून प्रवेश केला होता. तसेच इंदूरमध्ये असीम नागौरी याने तो ‘पंकज’ असल्याचे सांगून मंडपामध्ये प्रवेश केला होता. लोकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
सौजन्य:ZeeNews
इंदूरमधील देवास येथील असीम नागौरी याच्या भ्रमणभाषवर त्याने अनेक मुलींशी अश्लील संभाषण केल्याचे आढळून आले आहे. तो मुलींचे अश्लील व्हिडीओ प्रसारित करून त्यांना धमकावत होता. असीम नागौरी गरबा खेळायला आलेल्या महिला आणि मुली यांचे व्हिडिओ बनवत होता. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून गरबा आयोजकांना त्याच्यावर संशय आला. त्याच्याकडे ओळखपत्र मागितले असता ते देण्यास त्याने टाळाटाळ केली. यानंतर लोकांनी त्याला पकडले.