भिंगार (जिल्‍हा अहिल्‍यानगर) येथे धर्मांध अल्‍पवयीन मुलींकडून नवरात्रोत्‍सव मंडपातील देवीच्‍या घटांची विटंबना !

  • विटंबना करणारे आणि त्‍यांचे मुख्‍य सूत्रधार यांवर गुन्‍हा नोंद करण्‍याची सकल हिंदु समाजाची मागणी !

  • गुन्‍हा नोंद न झाल्‍यास भिंगार शहर बंद करण्‍याची चेतावणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

भिंगार (अहिल्‍यानगर) – येथील द्वारकाधीश कॉलनीमधील नवरात्रोत्‍सवानिमित्त मंडपामध्‍ये देवीची स्‍थापना करून देवीसमोर घटस्‍थापना करण्‍यात आली होती. १० ऑक्‍टोबर या दिवशी काही अल्‍पवयीन धर्मांध मुलींनी तोंडावर कापड बांधून मंडपामध्‍ये प्रवेश केला आणि घटस्‍थापनेची मांडणी अस्‍ताव्‍यस्‍त करून विटंबना केली. या घटनेची माहिती मिळताच स्‍थानिक हिंदुत्‍वनिष्‍ठ हे भिंगार कँप पोलीस ठाण्‍यात जमा झाले. या वेळी या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्‍या स्‍मिता अष्‍टेकर याही तात्‍काळ पोलीस ठाण्‍यात आल्‍या. घटाची विटंबना करणार्‍या अल्‍पवयीन मुलींचा शोध घेऊन तात्‍काळ अटक करण्‍याची मागणी या वेळी समस्‍त हिंदूंनी केली आहे. या धर्मांध मुली मंडपामधून बाहेर पडतांनाचा व्‍हिडिओसुद्धा स्‍थानिक हिंदूंना मिळाला असून तो त्‍यांनी पोलिसांना दाखवला आहे. (अहिल्‍यानगर येथे धर्मांधांच्‍या अशा कुरापती नित्‍याच्‍याच झाल्‍या आहेत. देवीच्‍या घटांची विटंबना म्‍हणजेच देवीचीच विटंबना होय ! पोलिसांचा धाक नसल्‍याने हिंदूंच्‍या मंदिरांतील मूर्तींची, हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांची विटंबना करण्‍याचे दु:साहस धर्मांधांकडून केले जाते, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद ! – संपादक)

असे कृत्‍य करण्‍यास कोण सांगते ? या मागचा मुख्‍य सूत्रधार कोण आहे ? यांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्‍यात यावी, अन्‍यथा पूर्ण भिंगार शहर बंद करण्‍यात येईल, अशी चेतावणीही स्‍मिता अष्‍टेकर आणि सकल हिंदु समाजाने या वेळी दिली आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते का कळत नाही ?