अवतारी कार्य हे ग्रहगती आणि काळ यांच्याही पलीकडे नेणारे असणे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असल्याने त्यांच्याविषयीही हे सूत्र लागू असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
१. ‘एकदा समाजात प्रतिकूल परिस्थिती असतांना महर्षींनी सांगितले, ‘काही दिवसांसाठी अध्यात्मप्रसार थांबवावा !’ त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींना प्रार्थना करून विचारले, ‘‘एकदम प्रसारसेवा थांबवल्याने आपले साधक आणि समाजातील जिज्ञासू लोक यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होईल; कारण समाज या काळापुरता आध्यात्मिक ज्ञानापासून वंचित होईल, तसेच साधक अन् समाजातील जिज्ञासू यांचे साधनेतील दिवसही वाया जातील. त्यामुळे कृपया आपण यावर उपाय सांगावेत.’’ नंतर या समस्येवर महर्षींनी सांगितल्याप्रमाणे उपाय करण्यात आले.
२. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रतिकूल काळातही अध्यात्मप्रसाराचे कार्य बंद पडण्यापासून सर्वांनाच वाचवले आणि ‘कठीण काळातही साधक अन् जिज्ञासू यांना साधनेचे ज्ञान कसे मिळेल ?’, हेही पाहिले. तसेच महर्षींनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला सांगून ‘साधकांचे कठीण काळात रक्षण कसे होईल’, तेही पाहिले.
३. या प्रसंगावरून देवाने माझ्या लक्षात आणून दिले, ‘अवतारी कार्य हे ग्रहगती आणि काळ यांच्याही पलीकडे नेणारे असते.’ असेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आहे. परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीविष्णूचे अंशावतार असल्याने त्यांनाही कार्य करण्यासाठी ग्रहगती आणि काळ यांचे बंधन नाही.
४. बर्याच वेळा आपत्काळाविषयी परात्पर गुरु डॉक्टर म्हणतात, ‘पुढे पुढे आपत्काळात सेवा थांबवून कसे चालेल ?’
५. संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या ‘तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ अवघ्या दिशा ।।’ या वचनानुसार ‘हरीच्या दासांसाठी, म्हणजे भक्तांसाठी सर्वकाळ आणि सर्व दिशा शुभच आहेत.’ असेच हे आहे.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार सांगितलेली ‘अष्टांग साधना’, ही साधकांना ग्रहगती अन् काळ यांच्याही पुढे नेणारी आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ