कल्याण येथे अन्य धर्मांना न्यून लेखून इस्लाम धर्माचे उदात्तीकरण करणारा फलक !
कल्याण – येथील बी.के. बिर्ला महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सार्वजनिक विद्युत् खांबावर एक फलक लावण्यात आला आहे. त्यात अन्य धर्मांना न्यून लेखून इस्लाम धर्माचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. (महाविद्यालय परिसरात हा फलक लावण्यामागे इस्लामप्रेमींचे काही षड्यंत्र नसेल कशावरून ? – संपादक) या फलकावर भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, तत्त्वज्ञानी, लेखिका, तसेच स्त्री-सुधारणावादी अॅनी बेझंट यांचे लिखाण आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मला अनेकदा असे वाटते की, इस्लाममधील महिला अन्य धर्मांच्या तुलनेत अधिक स्वतंत्र आहेत. एकपत्नीत्वाचा उपदेश करणार्या श्रद्धेपेक्षा इस्लाममध्ये महिलांना अधिक संरक्षण मिळते. कुराणानुसार स्त्री केवळ उदारमतवादी आहे.’
संपादकीय भूमिका
|