ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
‘लाडकी बहीण योजना’ बंद पडल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण
भोपाळ – अफवा पसरवल्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली’, असे संजय राऊत म्हणाले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात भोपाळ शहरात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संजय राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.