Muslims Attack Durga Puja Gonda : फटाके फोडण्यात आल्याने धर्मांध मुसलमानांनी दुर्गापूजा मंडपावर केले आक्रमण
गोंडा (उत्तरप्रदेश) येथील घटना
गोंडा (उत्तरप्रदेश) – येथील मस्कनवा मार्केट परिसरात ९ ऑक्टोबरला धर्मांध मुसलमानांनी दुर्गापूजा मंडपावर आक्रमण केले. त्यानी येथे दगडफेक करत हिंदूंना शिवीगाळ केली. त्यांनी देवतांनाही शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
१. दुर्गापूजेनंतर हिंदु मुलांनी मंडपाबाहेर फटाके फोडायला चालू केल्यावर त्याच्या आवाजाने शेजारी रहाणार्या मुसलमानांना राग आला.
२. ते मंडपाजवळ आले आणि हिंदूंना शिवीगाड करू लागले. तसेच त्यांनी दगडफेक केली आणि लाठीद्वारे मारहाण केली. यात १० ते १२ हिंदू घायाळ झाले.
३. हिंदूंनी मुसलमानांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते अधिक संतप्त झाले आणि त्यांनी आजूबाजूच्या भागांतील इतर मुसलमानांनाही बोलावले. या आक्रमणात मुन्ना, सुलतान, अस्लम आणि इतर मुसलमानांचा सहभाग होता. पोलिसांनी १२ मुसलमानांवर गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही धर्मांधांचे अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस होते, यातून त्यांच्यात किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे लक्षात येते ! |