Tripura Police On Durga Puja : दुर्गापूजेच्या काळात भोंगे आणि फटाके यांचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्यास कारवाई करणार !
त्रिपुराच्या पोलीस महासंचालकांचा आदेश
आगरताळा (त्रिपुरा) – त्रिपुराचे पोलीस महासंचालक अमिताभ रंजन यांनी सांगितले आहे की, दुर्गापूजेच्या काळात भोंगे किंवा फटाके यांचा आवाज दिवसभरात १ डेसिबलपेक्षा अधिक असता कामा नये. त्यानुसार आवाजाची तीव्रता मोजणारी यंत्रे विविध पोलीस ठाण्यांमध्ये वितरित करण्यात आली आहेत. ध्वनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. (केवळ हिंदूंच्या कार्यक्रमाच्या वेळीच ध्वनीप्रदूषण होते का ? – संपादक)
पोलीस महासंचालकांनी प्रसारमाध्यमांनाही आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही भागात निमयांपेक्षा अधिक आवाजाची पातळी दिसल्यास पोलिसांना कळवावे. असे केल्याने त्यांना तात्काळ कारवाई करण्यात साहाय्य होईल. (पोलिसांनी असे आवाहन इतर धर्मांच्या कार्यक्रमाच्या वेळी केल्याचे ऐकिवात नाही ! हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी दाखवली जाणारी अशी तत्परता पोलीस इतर धर्मांतील उत्सवाच्या वेळी दाखवतील का ? – संपादक)
संपादकीय भूमिकात्रिपुरामध्ये अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आदेश कधी दिले जातात का ? ध्वनीप्रदूषण करू नये, हे योग्य असेल, तरी यात भेदभाव करू नये, असेच हिंदूंना वाटते ! |