ATS Operation In Ratnagiri : सावर्डे (जिल्‍हा रत्नागिरी) येथे आतंकवादविरोधी पथकाने ६ धर्मांधांना घेतले कह्यात !

आतंकवादी संघटनांना पैसे पुरवल्‍याचा आरोप !

चिपळूण – आतंकवादविरोधी पथकाने तालुक्‍यातील सावर्डे येथे धाड टाकून ६ मुसलमानांना कह्यात घेतले आहे. आतंकवादी संघटनांना पैसे पुरवल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर असून ९ ऑक्‍टोबरला सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्‍यात आली. संबंधित संशयितांवर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. या धाडीमध्‍ये अनुमाने २४ टन वजनाचा खैर लाकडाचा साठा (बाजारभाव किंमत १० लाख ८ सहस्र रुपये) जप्‍त करण्‍यात आला आहे. लाकडाच्‍या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेला पैसा आतंकवादासाठी वापरला जात असल्‍याचा आतंकवादविरोधी पथकाला संशय आहे. सावर्डे येथील मुआज रियाज पाटणकर याच्‍यासह असिफ रशीद शेख, फारूख शेरखान पठाण, शहानवाज प्‍यारेजान, इरशाद शेख आणि वसीम अख्‍तर मुक्‍तार अहमद मोमीन अशी कह्यात घेतलेल्‍यांची नावे आहेत.

मिळालेल्‍या माहितीनुसार

१. तालुक्‍यातील सावर्डे परिसरात २ दिवसांपूर्वीच आतंकवादविरोधी पथक आले होते. या पथकाने सावर्डे बाजारपेठेच्‍या जवळ असलेल्‍या परिसरातील ६ जणांना कह्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईला नेले.

२. संशयितांवर कर्नाटक राज्‍यातून छुप्‍या पद्धतीने १० लाख रुपयांचे खैराचे लाकूड आणून ते सावर्डे येथे बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्‍याच्‍या आरोप आहे.

३. कर्नाटकातील व्‍यापारी शहानवाज प्‍यारेजान याच्‍याकडून वसीम मोमीन याने लाकूड खरेदी केले. असिफ रशीद शेख याच्‍या मालकीच्‍या ट्रकात लाकूड भरून चालक इरशाद शेख याने ते सावर्डे येथे आणले होते.

४. यांतील वसीम अख्‍तर मुक्‍तार अहमद मोमीन हा ‘इस्‍लामिक स्‍टेट’ या आतंकवादी संघटने समवेत काम करणार्‍या एका व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात असल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे.

५. जुलै २०२३ मध्‍ये ‘इस्‍लामिक स्‍टेट’ या आतंकवादी संघटनेच्‍या मध्‍यप्रदेशाशील शाखा असलेल्‍या ‘अल सुफा मॉडेल’मधील आकिफ नाचण याला अटक करण्‍यात आली होती. त्‍याचे इस्‍लामपुरा भिवंडी येथील वसीम अख्‍तर मुक्‍तार अहमद मोमीन याच्‍याशी जवळीक असल्‍याचे अन्‍वेषणात अगोदरच उघडकीस आले होते.

६. याविषयी पोलिसांनी अन्‍वेषण केले असता वसीम अख्‍तर मुक्‍तार अहमद मोमीन हा बेकायदेशीरपणे खैराच्‍या लाकडांची चोरून वाहतूक करत होता. त्‍या लाकडाची खरेदी-विक्री करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवून ते पैसे तो देशविघातक कृत्‍ये करणार्‍या कट्टरवादी व्‍यक्‍ती आणि संघटनांना देत असल्‍याचे समोर आले होते.

संपादकीय भूमिका

  • सावर्डेसारख्‍या छोट्याशा गावातील मुसलमान आतंकवादी संघटनांना पैसे पुरवतात, यावरून भारतात आतंकवाद्यांची यंत्रणा गल्ली-बोळांमध्‍ये कार्यरत असल्‍याचे दिसून येते. आतंकवाद आता दाराशी येऊन ठेपला असून ही स्‍थिती भारतासाठी धोकादायक !
  • केवळ विदेशांतूनच नव्‍हे, तर भारतात राहून आतंकवाद्यांना साहाय्‍य करणार्‍यांची पाळे-मुळे खणून काढण्‍यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न करणे आवश्‍यक !
  • अशा घटनेतून स्‍थानिक जनतेने सतत सतर्क राहून संशयास्‍पद आढळणार्‍या घटनांविषयी पोलिसांना माहिती देणे आवश्‍यक ठरते !