Wajid Khan Arrest : जिहादी आतंकवादाचे समर्थन करणारा स्वयंघोषित पत्रकार वाजिद खान याला अटक
जयपूर (राजस्थान) – राजस्थान पोलिसांनी इस्लामी आतंकवादाचे समर्थन करणारा आणि सातत्याने हिंदुद्वेषी मजकूर सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करणारा स्वयंघोषित पत्रकार वाजिद खान याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पोलीस सध्या त्याच्या ‘पोस्ट’मधील लिखाण आणि त्याचे संपर्क याविषयी अन्वेषण करत आहेत. वाजिद खान सामाजिक माध्यमांवरून हिंदू आणि ज्यू यांच्या विरोधात चिथावणीखोर लिखाण करत होता. त्याने एक्सवर त्याची ओळख ‘आखाती देशातील अल् जझिरा या प्रसारमाध्यमामध्ये स्तंभलेखक म्हणून कार्यरत’ अशी केली होती. वाजिद खान हा राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील गवाना येथील रहिवासी आहे; मात्र राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्याने तो अमेरिकेत वास्तव्य करत असल्याचे म्हटले हाते.
Police arrest self-proclaimed journalist and J!h@d! supporter, Wajid Khan.
👉 These are the ideological #terrorists who make inflammatory statements against Hindus on social media, and support J!h@d! terrorism.
The Government should try to punish such persons severely.
वाजिद… pic.twitter.com/ZRZxeYHwRC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 10, 2024
वाजिद खान याचा हिंदुद्वेष आणि जिहादींविषयी प्रेम !
८ ऑक्टोबर या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या आक्रमणाला १ वर्ष झाले. यानंतर खान याने या आक्रमणाचे उदात्तीकरण केले. जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात इस्रायलच्या पाठीशी उभ्या असलेल्या हिंदूंविषयी तो वारंवार ‘एक्स’वरून गरळओक करत होता. वाजिद खान याने ४ ऑक्टोबर या दिवशी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे महंत यति नरसिंहानंद आणि त्यांचे अनुयायी यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.
संपादकीय भूमिकासामाजिक माध्यमांवरून हिंदूंच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करणारे आणि जिहादी आतंकवादाचे समर्थन करणारे वैचारिक आतंकवादी आहेत. अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |