विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ मुख्याधिकार्यांच्या नियुक्त्या !
मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव रिक्त असलेल्या महाराष्ट्रातील ११ नगर परिषदांच्या मुख्याधिकार्यांच्या ९ ऑक्टोबर या दिवशी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जुम्मा प्यारेवाले (तुमसर नगर परिषद, भंडारा), अमोल बागुल (एरंडोल, जळगाव), श्रीकांत लाळगे (लोहा, नांदेड), निशिकांत गवई (यावल, जळगाव), रामनिवास झंवर (धरणगाव, जळगाव), सचिन पुदाके (बिलोली, नांदेड), सुरज जाधव (जळगाव-जामोद, बुलडाणा), अंबादास गर्कळ (मुक्ताईनगर, जळगाव), अविनाथ गांगोडे (नवापूर, नंदूरबार), विजया घाडगे (शेवगाव, अहिल्यानगर) आणि सचिन बच्छाव (मुरुड-जंजिरा, रायगड) अशा प्रकारे अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.