हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्या ज्ञानेश महाराव यांच्याकडून जाहीर क्षमायाचना !
प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांचा अवमान केल्याचे प्रकरण
|
मुंबई – प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि अन्य हिंदु देवतांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अश्लाघ्य वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराव यांच्या कार्यालयात जाऊन भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी त्यांना क्षमा मागण्यास भाग पाडले. याविषयीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र प्रसारित झाला आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागतो’, असे महाराव या वेळी म्हणाले. शिरवडकर यांनी त्यांना या वेळी चांगलेच धारेवर धरून खडसावले. त्यानंतर ‘भविष्यात प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ किंवा अन्य कोणत्याही देवतेविषयी अपशब्द काढणार नाही’, असे आश्वासनही त्यांनी दिले.