वर्ष २०१९ च्या ‘सरळ सेवा भरती’मधील उमेदवारांना एस्.टी.च्या सेवेत घेणार ! – गोगावले, अध्यक्ष, एस्.टी. महामंडळ
मुंबई – वर्ष २०१९ मधील सरळ सेवा भरतीमधील अतिरिक्त सूचीमधील १ सहस्र ५८ जणांना एस्.टी.चे चालक आणि वाहक पदावर सामावून घेण्यात येणार आहे, अशी माहिती एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांनी दिली.
वर्ष २०१९ मधील प्रतीक्षा सूचीतील ३३७ उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया महामंडळाकडून चालू करण्यात येत आहे. उर्वरित ७२१ उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे आणि रिक्त जागेनुसार एस्.टी.च्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियुक्त्यांविषयी काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.